साखर पोती घेऊन जाणार ट्रक हातखंबा येथे उलटून २ जखमी..

रत्नागिरी – गोवा महामार्गावर हातखंबा येथील दर्ग्याजवळील (गुरववाडी) तीव्र उतारावर साखरेने भरलेला ट्रक नियंत्रण सुटून सुमारे दीडशे फूट खाली कोसळला. त्यात चालक आणि ड्रायव्हर जखमी झाले आहेत. आज सकाळी ११.३० च्या दरम्यान हा अपघात झाला.
उपलब्ध माहितीनुसार ट्रक नंबर एमएच ५०-९४९५ सोलापूर, मंगळवेढा मार्गे जयगडला चालला होता. तेव्हा हा अपघात झाला. त्यात शिवाजी श्रीरंग शिंदे,वय-३२, रा. मंगळवेढा, जि. सोलापूर व क्लिनर दादा मनोहर मेटकरे, वय २७, हे दोघे जखमी झाले. त्यांना रत्नागिरीतील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अपघातातील ट्रकचे मोठे नुकसान झाले असून, त्यातील पोती बाहेर अस्ताव्यस्त पडली आहेत. हे ठिकाण अपघात प्रवणक्षेत्र म्हणून ओळखले जाते.

Exit mobile version