रत्नागिरी : इतर मागास वर्गाचा आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय उद्धार व्हावा यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताच्या संविधानामध्ये कलम ३४० अन्वये घटनादत्त तरतूद करुन ठेवली. या कलमाची अंमलबजावणी करावी आणि मागे पडलेल्या ओबीसी समाजाचा उत्कर्ष व्हावा यासाठी
देशाचे प्रधानमंत्री यांना निवेदन देण्यासाठी संविधान दिनाच्या पार्श्वभुमीवर शुक्रवार दिनांक २५ नोव्हेंबर २२ रोजी दुपारी १ वाजता गगनगिरी महाराज आश्रम,थिबा पॅलेस शेजा
री,मु.पो.कर्ले,ता.जि.रत्नागिरी येथे ओबीसींचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता यावेळी प्रास्तविक करताना युवक कार्यकर्ते रोशन पाटील यांनी सर्व ओबीसींचा इतिहास सागुन प्रमुख मागण्या सादर केल्या.येथील ओबीसी हा बहुसंख्येने शेतकरी असुन त्याच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पाढा प्रकाश उर्फ बावाशेठ साळवी,राजीव कीर,नंदकुमार मोहीते यांनी अतिशय प्रभावीपणे मांडली.या सर्वांना उत्तर देताना विद्यमान आमदार,माजीऊर्जामंत्री,भाजपा प्रदेशाध्यक्ष,व तेली समाजाचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मातृपितृ ऋण ,आपल्या भुमिप्रती असलेले ऋण ,आणि समाजाप्रती असलेले ऋण विषद करताना ओबीसीप्रती आतापर्यंत केलेले काम व याहीपुढे ओबीसींना न्याय मिळेपर्यंत सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांविषयी आपल्या शिष्टमंडळासह लवकरच मा.मुख्यमंत्री यांच्या समवेत बैठक घेऊया असे सांगितले.क्रीडाक्षेत्रात स्विमिंगमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर होत असलेल्या अन्यायासंदर्भातील निवेदन स्विकारुन ताबडतोब मार्गी लावण्याचा पण प्रयत्न केला.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुधीर वासावे यांनी व आभार व्यक्त रघुविर शेलार यांनी केले.या मेळाव्याचे उत्कृष्ट नियोजन ॲडव्होकेट सुजित झिमण,ॲडव्होकेट महेंद्र मांडवकर,सौ.स्नेहाताई चव्हाण,प्रभाकर खानविलकर,मामा ढवळे,कौस्तुभ नागवेकर,प्रदीप घडशी,तानाजी कुळीये,मुन्ना चवंडे,विजय सालीम, सचिन लांजेकर, मयुर बळगे,परीस पाटील,दिपक रहाटे,सिध्देश सुर्वे,सुभाष लांजेकर,लिलाधर भडकमकर,ओम कीर,मनोज नाचणकर,दिनकर नाचणकर,सौरभ पिलणकर,अमोघ पिलणकर,सुरेंद्र घुडे,आर.के.विलणकर,रविद्र भातडे,सचिन भातडे,दत्ताराम तांबे,सौ.सिमा सुर्वे,अविनाश गुरव,दशरथ आग्रे,अनंत आग्रे,अरुण मांडवकर,नारायण आग्रे,गजानन धनावडे, सोहम खानविलकर इत्यादींनी मेहनत घेतली
. दखल न्यूज महाराष्ट्र
मातृभुमी ऋण , मातृपितृ ऋण आणि समाज ऋण फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार : आमदार बावनकुळे .
