भारतीय सत्यशोधक संघ आयोजित संविधान गुणगौरव स्पर्धा परीक्षेत श्रमिक विद्यालयाचे घवघवीत यश.

रत्नागिरी : भारतीय सत्यशोधक संघ यांनी आयोजित केलेल्या संविधान गुणगौरव स्पर्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी व संविधानाविषयी जनजागृती होऊन संविधानाचा अभ्यास शालेय विद्यार्थ्यांनी करावा या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
            या स्पर्धेत श्रमिक किसान सेवा समिती  रत्नागिरी संचालित श्रमिक  विद्यालय व लोकनेते शामरावजी पेजे कनिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे शाळेमधून संविधान गुणगौरव स्पर्धा यादीत  कु. तन्वी चंद्रकांत मोर्ये  – (इयत्ता नववी )प्रथम क्रमांक – बक्षिसाचे स्वरूप- रुपये 5000 व प्रमाणपत्र, कु. श्रीश रामकृष्ण  तोसकर  -( इयत्ता नववी) द्वितीय क्रमांक- बक्षिसाचे स्वरूप- रुपये 3000 व प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
            या परीक्षेकरिता विद्यालयातील इयत्ता आठवी ते दहावी या गटातील 42 विद्यार्थी परीक्षेकरता प्रविष्ट झाले होते. सर्व विद्यार्थी पास झाले असून यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थापक/अध्यक्ष श्री नंदकुमार मोहिते, मुख्याध्यापक श्री. मधुकर थुळ, संस्था पदाधिकारी, कर्मचारी, पालक, शिक्षण प्रेमी व ग्रामस्थ तसेच मार्गदर्शक शिक्षक- श्री बांबाडे, श्री गाडी, श्री तरळ यांनी अभिनंदन केले आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version