मिरजोळे पाटीलवाडी येथील विनापरवाना गावठी हातभट्टीवर धाड मारत तीन लाखाचा ऐवज नष्ट.

रत्नागिरी : तालुक्यातील मिरजोळे पाटीलवाडी येथील विनापरवाना सुरु असलेल्या गावठी हातभट्टीवर पोलीसांनी धाड टाकून कारवाई केली आहे. या कारवाईत 40 लिटर गावठी दारुसह 3 लाख 23 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
मिरजोळे पाटीलवाडी येथे हातभटटी सुरु असल्याची खबर पोलीसांना लागली पोलीसांनी सापळा रचत या हातभट्टीवर धाड टाकली. आणि या विनापरवाना हातभट्टीवर कारवाई सुरू केली. त्यावेळी प्रत्यक्ष त्या ठिकाणी एक 24 वर्षीय तरुण गावठी हातभट्टीची दारु गाळत असताना सापडला त्याला जागीच ताब्यात घेण्यात आले. हातभट्टीमध्ये 400 लीटर गावठी दारु, 200 लिटर क्षमतेचे 60 बॅरल, 12 हजार लिटर रसायन असा एकूण 3 लाख 23 हजार रुपयांचा मुददेमाल जागीच नष्ट करुन गावठी हातभट्टी उध्वस्त करण्यात आली. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे, शहर पोलीस निरिक्षक विनीत चौधरी, पोलीस निरिक्षक हेमंतकुमार शहा, शहर पोलीस ठाण्याचे पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक आणि क्युआरिटी पथकाने केली
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

Exit mobile version