रत्नागिरी – चिपळूण शहरातील काविळतळी येथील विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी घडली . याबाबत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , ऋतुजा रुपेश पालशेतकर ( ३० रा . काविळतळी साईशा अपार्टमेंट , चिपळूण ) असे या विवाहितेचे नाव आहे . ऋतुजा पालशेतकर राहत्या घरी ओढणीच्या साह्याने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली . तिला खाली उतरून उपचाराकरिता खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते . मात्र , तेथील डॉक्टरांनी तिला तपासून मयत घोषित केले. पोलिस अधिक तपास करीत आहेत.
चिपळूणात विवाहितेची आत्महत्या
