मुंबई – २५ हजार रुपयांची लाच घेताना उप विभागीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई यांनी रंगेहात पकडले. हेमंत राठोड असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. ते उप विभागीय अधिकारी (वर्ग-१), या पदावर सार्वजनिक बांधकाम उप विभाग, वांद्रे क्र. १, मुंबई याठिकाणी कार्यरत होते.
सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी यांनी शासकिय विश्रामगृहात कंत्राटी पध्दतीने उपहारगृह चालविण्यास घेतले आहे. सदर उपहारगृह करार पुढे चालू ठेवण्यासाठी राठोड यांनी फिर्यादी यांच्याकडे दरमहा रु.५०,०००/- इतक्या रक्कमेच्या लाचेची मागणी केली. फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग येथे लेखी तक्रार अर्ज दिला.
तक्रारी प्रमाणे पडताळणी दरम्यान राठोड यांनी फिर्यादी यांच्याकडे रु. ५०,०००/- इतक्या लाचेची मागणी करून तडजोडीअंती रु.व२५,०००/- लाचेची रक्कम स्विकारल्याने राठोड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत रंगेहात पकडले. आणि गुन्हा दाखल करण्यात आला.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*
२५ हजार रुपयांची लाच घेताना उप-विभागीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.
