प्रतिनिधी अलिबाग (मिथुन वैद्य)
अलिबाग – संविधान दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत अलिबाग जिल्हा सामान्य रुग्णालय व नेहरू युवा केंद्र अलिबागच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थांचे दुष्परिणाम याविषयावर अलिबाग तालुक्यातील कोळघर येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळा येथे व्यसनमुक्ती स्पर्धां व मौखिक आरोग्य तपासणी शिबीर नुकतेच संपन्न
झाले.
तंबाखू नियंत्रण कक्षाचे जिल्हा कार्यक्रम सल्लागार डॉ.विकास पवार, दंत चिकित्सक डॉ.नाविना ठाकूर, समाजसेवक सुशील साईकर, समाजसेवक प्रणित म्हात्रे, आदिवासी आश्रमशाळेचे मुख्याध्यापक श्री.पाटील आणि नेहरू युवा केंद्र रायगडचे जिल्हा युवा अधिकारी निशांत रौतेला यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
श्री.साईकर यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती दिली व विद्यार्थ्यांनी “माझे कुटुंब तंबाखूमुक्त ठेवेन व माझे गाव तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रयत्न करेन” प्रतिज्ञा घेतली पाहिजे, असे सांगितले. तर श्री.प्रणित पाटील यांनी अत्यंत सोप्या शब्दात संविधान दिनाचे महत्व मुलांना सांगितले