जिल्हास्तरीय “तंत्र प्रदर्शनी ” 2 डिसेंबर ला..

चंद्रपूर :- व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातर्फे चंद्रपूर जिल्हा तंत्र  प्रदर्शनी 2022 चे आयोजन 2 डिसेंबर ला शासकीय मुलींची औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे आयोजीत करण्यात आल्याची माहिती जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी चंद्रपूर
कल्पना खोब्रागडे यांनी कळविले आहे.


         जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औदयोगिक प्रशिक्षण  संस्था, व्यावसायीक व द्धिलक्षी अभ्यासक्रमांचा यात सहभाग राहणार असून सर्व 15 तालुक्यात आयोजीत तालुका स्तरीय प्रदर्शनीतुन प्रथम आलेल्या प्रयोगांचा समावेश जिल्हास्तरीय प्रदर्शनित करण्यात येणार असून दि.2  डिसेंबरला सकाळी 11 वाजता उदघाटनानंतर प्रदर्शनी पाहण्यासाठी खूली राहणार आहे. साय. 4 वाजता परिक्षणानंतर निकाल घोषीत करण्यात येणार असून गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय, आलेल्या प्रात्यक्षिकांना व सहभागी विद्यार्थ्याना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. या प्रदर्शनित जिल्ह्यातील बहुसंख्य विद्यार्थी व शिक्षक सहभागी होणार असल्याची माहिती आयोजन समितीचे  प्रा.महेश पानसे, प्रा.गुणवंत दवै, प्रा.शेखर जुमडे प्रा.शालीक फाले, प्रा अब्दुल रतिब,प़ा.गोबाडे, प्रा. झाडे, प्रा.धोटे, प्रा.घोटेकर यांनी दिली आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र*

Exit mobile version