रत्नागिरी:- नव्याने झालेल्या नळपाणी योजनेच्या कामातील ढिसाळपणा हळूहळू समोर येऊ लागला आहे. रत्नागिरीचे नळ पाणी योजना पूर्ण होण्याआधीच कामाच्या दर्जावरून गाजत आहे. शहरातील मुख्य रस्त्यात अनेक वेळा नव्याने घातलेली पाईपलाईन फुटण्याचे प्रकार घडत असून नगरपरिषद प्रशासन त्यावर तात्पुरती मलमपट्टी करीत आहे. एकाच ठिकाणी वारंवार नळ पाणी योजनेबाबत तक्रारी येत असल्यामुळे त्या ठिकाणी सतत खोदाई केली जाते व हा परिसर रत्नागिरी शहरातील मुख्य रस्त्यावरती आहे त्यामुळे त्याचा नाहक त्रास आजूबाजूचे व्यापारी आणि नागरिकांना होत आहे.
दोन दिवसापासून मारुती मंदिर परिसरात पाईपलाईन काम सुरू होते. काल दुपारी दुपारी ही पाईप लाईन फुटल्याने त्यातून पाण्याचे लोंढे वाहू लागले हे पाणी फेरीवाले त्यांच्या स्टाँल मध्ये शिरू लागले त्यामुळे दुकानदारांची धावपळ उडाली हे पाणी दुकानात शिरू नये म्हणून त्यांनी पाणी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला याशिवाय या परिसरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची ही धावपळ उडाली यामुळे पुन्हा एकदा नगर परिषदेच्या नव्या पाईपलाईनचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मारुती मंदिर येथील स्टेडियम समोर पाईप लाईन वारंवार फुटत आहे. मंगळवारी दुपारी ही पाइपलाइन फुटली आणि हजारो लिटर पाणी रस्त्यावरून वाया गेले. विशेष म्हणजे रत्नागिरी नगरपालिकेची नळपाणी योजना ज्या यंत्रसामुग्री वापरून फिटिंग केली गेली ती यंत्रसामग्रीच रत्नागिरी नगरपालिका प्रशासनाकडे उपलब्ध नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे मुख्य लाईन मध्ये फिटिंग मध्ये दुरुस्ती आल्यास हे जॉईन पुन्हा फिटिंग करायचे कसे असा प्रश्न रत्नागिरी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसमोर येऊन ठेपला आहे अशी चर्चा त्या कामगारांमध्ये सुरू होती. त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने त्या संदर्भात सामग्री उपलब्ध करून घेणे आवश्यक आहे. तसेच टेक्निकल माहिती असलेले तज्ञ फिटर र. न. प. प्रशासनाने उपलब्ध करणे गरजेचे आहे असेही बोलले जात आहे.
रनपच्या नव्या पाणी योजनेचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. मात्र दररोज योजनेचे नवे पाईप कुठे ना कुठे फुटून पाण्याची नासाडी होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. शहरातील मारुती मंदिर येथे पाइपलाइन फुटण्याच्या घटना वारंवार होत आहेत मंगळवारी देखील दुपारी येथील पाईप लाईन पुन्हा फुटली. डांबरी रस्त्या खालून पाण्याचा झोतच बाहेर पडला आणि परिसरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. हजारो लिटर पाणी अवघ्या काही मिनिटात वाया गेले. अचानक पाणी सर्वत्र झाल्याने फेरीवाल्यांची धावपळ उडाली. नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गळती लागलेल्या ठिकाणी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करत गळती लागलेली पाईप लाईन दुरुस्त केली मात्र वारंवार नळ पाणी जोडणी मध्ये येणाऱ्या समस्या पाहता नळपाणी योजनेच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. विरोधी पक्षाच्या माध्यमातून सोशल मीडिया वरती देखील अनेक तरुण याबाबत सक्रिय झाले असून सोशल मीडियावर याबाबतचे व्हिडिओ, फोटो व्हायरल केले जात आहेत. यामध्ये नळ पाणी योजनेच्या कार्यकाळात विद्यमान असलेल्या राजकीय प्रतिनिधींविषयी देखील नाराजी व्यक्त केली जात आहे.
हे सर्व खरे असले तरी देखील नळपाणी योजना पूर्णत्वास जात नाही तोपर्यंतच अशा प्रकारची तक्रारी सतत येणे ही गोष्ट नक्कीच योग्य नाही असे मत नागरिक व्यक्त करू लागले आहेत. आता तरी स्थानिक प्रशासन याबाबत सतर्क होऊन उपाययोजना करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*