महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप? राजकीय चर्चांना उधाण..!

मुंबई : महाराष्ट्राला राजकीय भूकंप नवीन नक्कीच नाही. शिवसेनेच्या शिंदे गटाच्या बंदनंतर अत्ता पुन्हा शिवसेनेच्या शिंदे गटात ही पुन्हा बंड होणार अशा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. शिवसेनेच्या ४० बंडखोर आमदारांपैकी २२ आमदार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटानं केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातील प्रसिद्ध सदर असलेल्या रोखठोकमधून हा दावा करण्यात आला आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना भाजपनं तात्पुरती व्यवस्था निर्माण केली आहे. त्यांची मुख्यमंत्रीपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकलं आहे, अशी टीका सामनाच्या रोखठोक सदरातून करण्यात आली आहे. तसेच, एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही.


शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील, असं म्हणत शिंदे गट आणि भाजपवर सामना रोखठोकमधून निशाणा साधला आहे. सामनातील रोखठोक सदरातून ठाकरे गटानं मुख्यमंत्री शिंदेंसह भाजपवर निशाणा साधला आहे. रोखठोकमध्ये म्हटलंय की, “महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते.” तसेच, “एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील असे सामनातून बोलले गेले आहे .
या वृत्तानंतर मात्र राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version