चिपळूण : (ओंकार रेळेकर )चिपळूण मधील लोकप्रिय एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकणारी कु. निधी जाधव हिने मातोश्री स्पोर्ट्स क्लब अंधेरी आयोजित राज्यस्तरीय इंडियन योगासन प्राईम लीग स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचे घवघवीत यश मिळवले आहे . वेदांत पवार सुहास पवार या दोन प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली निधी जाधव हिने योगासन स्पर्धेत यश मिळवले. एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या चेअरमन सौ. सायली अमोल भोजने, संचालक अँड. अमोल चंद्रकांत भोजने, संचालक सौ. पूजा शुभम खताते, मुख्याध्यापक श्री. राकेश भुरण पर्यवेक्षक श्री. मुकुंद ठसाळे यांनी निधी जाधव हिचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
एसीबी इंटरनॅशनल स्कूल कापसाळच्या चेअरमन सौ. सायली अमोल भोजने आणि संचालक
तरुण उद्योजक अँड.अमोल चंद्रकांत भोजने यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या स्कूल मध्ये नर्सरी ते ८ वी पर्यंत मुलांना सीबीएसई बोर्ड पॅटर्न चे शिक्षण दिले जाते जागतिक पातळीवर दिले जाणारे आद्ययावात शिक्षण पद्धतीचा अवलंब करीत चेअरमन सौ. सायली अमोल भोजने, अमोल भोजने स्वतः मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष देऊन आहेत.
शिवाय विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा आणि शेक्षणिक स्पर्धेत यांचे मुलांना नेहमी प्रोत्साहन असते.चिपळूण मधील मुलांना स्विमिंगचा आनंद लुटता यावा या करिता एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये मुलांना प्रवेश देण्यात येणार आहे, येथे लहान मुलांन करिता आणि मोठ्या मुलांकरिता स्वतंत्र स्विमिंगपुल असून वेळोवेळी टेक्निशियन कडून पाहणी करून तसेच पाण्याचे फिल्टरेशन करून स्विमिंगपूल ची देखरेख ठेवली जाते तसेच पोहण्याचा अनुभव असलेले ट्रेनर संतोष कोटकर कायमस्वरूपी येथे सेवेत आहेत.
मातोश्री स्पोर्ट्स क्लब अंधेरी येथे निधी जाधव हिने योगासन स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करून एसीबी इंटरनॅशनल स्कूल चे उंचावले आहे. फोटो : निधी जाधव हिचा सत्कार करताना एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका सौ.पूजा खताते ,
मुख्याध्यापक श्री. राकेश भुरण, पर्यवेक्षक श्री. मुकुंद ठसाळे छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)
राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या निधी जाधव हिचे यश; मातोश्री स्पोर्ट्स क्लब अंधेरी येथे निधी जाधव हिने स्कूलचे उंचावले नाव.
