दीड लाख रुपये लाच घेताना न्यायालयातील त्या लिपिकाला रंगेहाथ पकडले.

पुणे – शिवाजीनगर न्यायालयातील सुरू असलेल्या एका प्रकरणात सुटका करण्यासाठी न्यायाधीशांना सांगून मदत करतो, असे सांगून दीड लाख रुपये लाच स्विकारताना वरिष्ठ लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) ने रंगेहाथ पकडले. याबाबत 23 वर्षीय तरुणाने फिर्याद दिली आहे. देठे हा जिल्हा न्यायलयात वरिष्ठ लिपिक पदावर कार्यरत आहे. फिर्यादीच्या मावसभावावर मोक्कानुसार गुन्हा दाखल आहे. दरम्यान देठे याला न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पाच डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश सत्र न्यायाधीश यांनी दिला आहे. दोन लाखाची लाच मागत त्याला दीड लाख रुपये स्विकारताना रंगेहाथ पकडले.
           सचिन अशोक देठे (वय 39, रा.राजगुरुनगर) असे त्याचे नाव आहे. देठे याच्या आवाजाचा नमुना घ्यायचा आहे. त्याने ज्या खटल्यासाठी लाचेची मागणी केली. त्या खटल्याच्या कागदपत्रांची माहिती घ्यायची आहे. याखेरीज, त्याने तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्याची कागदपत्रांची प्रत देण्यासाठी गुगल पे द्वारे दोन हजार रुपये स्विकारल्याचे नमूद केले आहे. त्याबाबत आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे. याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील रमेश घोरपडे यांनी केली. त्यांना विक्रमसिंह घोरपडे यांनी सहकार्य केले. बचाव पक्षातर्फे ऍड. जितेंद्र सावंत, ऍड. विपुल दुशिंग, ऍड. राहुल देशमुख आणि ऍड. राहुल भरेकर यांनी काम पाहिले. याप्रकरणी पुढील तपास एसीबीच्या पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करत आहे.
*दखल न्यूज महाराष्ट्र*

Exit mobile version