माणगाव शहर शेकाप चिटणीसपदी राजू मुंढे यांची नियुक्ती.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर.

रायगड : जिल्हापरिषदेवर कायम शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अबाधित ठेवणाऱ्या शेकाप कडून आगामी ग्रामपंचायत व स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका डोळ्यासमोर समोर ठेवून विविध तालुके आणि शहर कार्यकारिणी पदाधिकारी यांच्या नवनियुक्त्या करून फेरबदल करण्यात येत आहेत. नुकत्याच मोर्बा येथे शेकाप सर्वे-सर्वा सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून तसेच शेकाप ची विचारधारा स्वीकारत विविध पक्षांच्या विविध कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला होता,यामध्ये भाजप चे माजी माणगाव शहर अध्यक्ष राजू मुंढे यांनी देखील शेकापमध्ये प्रवेश करत घरवापसी केली. मागील पाच भाजप च्या माणगांव शहर अध्यक्ष पदावर काम केलेले व तत्पुर्वी शेकाप चे खंदे कार्यकर्ते असलेले राजू मुंढे यांनी शेकाप मध्ये पुन्हा प्रवेश केल्यानंतर शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील,माजी आमदार पंडित पाटील यांच्या आदेशानुसार राजू मुंढे यांची शेकाप च्या माणगाव शहर चिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.व तसे नियुक्तीपत्र देखील माणगाव तालुका चिटणीस रमेश मोरे यांच्याहस्ते देण्यात आले आहे. शहर चिटणीस पदी नियुक्ती झाल्यानंतर माणगाव शहरात शेतकरी कामगार पक्षाला नवउभारी देणार असल्याचे मत पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

Exit mobile version