रा.जि.प.उतेखोलवाडी शाळेत खाऊगल्ली कार्यक्रम संपन्न.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर

माणगाव : माणगाव तालुक्यातील १००% पटनोंदणी असलेली शहरातील रायगड जिल्हा परिषद शाळा उतेखोलवाडी शाळेतील शिक्षक नेहमीच विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासाठी आग्रही राहिले आहेत.अश्या उपक्रमशील व जेष्ठ शिक्षकांच्या प्रयत्नांमुळे शहरातील विविध विविध पालकांचा कल आपली मुले उतेखोलवाडी शाळेतच दाखल केली पाहिजेत असा असा असतो. अशाचप्रकारे २ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक दृष्टीकोन जागरूक व्हावा, व्यावसायिक व व्यवहार ज्ञान समजावे या करिता खाऊ गल्ली कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यामध्ये १ ली ते ४ थी च्या बहुतांशी विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या खाऊ चे स्टॉल लावले होते यामध्ये,पकोडे,वडापाव, गुलाबजाम, कटलेट,ज्यूस,लिंबू सरबत अश्याप्रकारच्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. या खाऊ गल्ली कार्यक्रमाला बहुतांशी पालकांनी उपस्थिती दर्शविली होती,तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सुधाकर पालकर गुरुजी, नामदेव खराडे यांनी देखील उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मुख्याध्यापिका शमिका अंबुरले,जेष्ठ शिक्षिका नंदिनी वाले,उपक्रमशील शिक्षिका विनया जाधव,स्नेहल उतेकर यांनी मेहनत घेतली. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version