रत्नागिरी चिंचखरी फाटकवाडी येथे ६ डिसेंबरपासून दत्तजयंती उत्सवाचे आयोजन.

प्रतिनिधी : गौरव मुळ्ये.

रत्नागिरी – शहराजवळील चिंचखरी फाटकवाडी येथे ६ डिसेंबर ते ८ डिसेंबर २०२२ या तीन दिवसाच्या कालावधीत दत्तजयंती उत्सवाचे प्रतिवर्षाप्रमाणे आयोजन करण्यात आले आहे. दि.०६ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता अखंड नामजपाला सुरुवात होणार आहे. दि.०७ डिसेंबर रोजी
सकाळी ११ वाजता नामजपाची सांगता होणार आहे. सायंकाळी ५ वाजता ह.भ.प कौस्तुभ फाटक यांचे दत्तजन्माचे कीर्तन होणार आहे. दि ०८ डिसेंबर रोजी सहस्रनाम व सत्यनारायण पूजा, महाप्रसाद सायंकाळी सुस्वर भजन होणार आहे. तीन दिवसीय उत्सवाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन समस्त फाटक कुटुंबीय व फाटकवाडी ग्रामस्थ यांनी केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

Exit mobile version