मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती आहे. शरद पवार अधिवेशनासाठी दिल्लीला गेले आहेत. पवारांना जीवे मारण्याची आलेली धमकी यामुळे राजकीय वर्तुळात गोंधळ उडाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचं धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं फोनवर म्हटलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील मलबार हिल परिसरात सिल्वर ओक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं निवासस्थान आहे. याच सिल्वर ओकवर आज एका अज्ञात व्यक्तिचा फोन आला. अज्ञात इसमानं शरद पवारांना जीवे मारणार असल्याची धमकी दिली. शरद पवारांच्या बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जेष्ठ नेते शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी..
