राम भोस्तेकर माणगाव
महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात 22 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशन नागपूर येथे हिवाळी अधिवेशनावर महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघाचे अध्यक्ष मा. बाळासाहेब शिंदे पाटील व राज्य सचिव मा. कमलाकर मांगले पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा नेण्यात येणार आहे अशी माहिती रायगड जिल्हा पोलीस पाटील संघाचे कार्याध्यक्ष दहिवली गावचेपोलीस पाटील(ता. माणगावचे) चंद्रकांत चेरफळे यांनी अशी माहिती दिली. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील यांच्या मागण्या अनेक वर्षापासून शासन दरबारी प्रलंबित आहेत. या मागण्यासाठी अनेकदा सरकारला निवेदन देण्यात आली होती. मात्र कोणत्याही सरकारने याची गांभिर्याने दखल घेतली नाही. या मध्ये दरमहा किमान 18 हाजार रुपये मानधन मिळावे. निवृत्तीचे वय 65 करावे .निवृत्ती नंतर किमान पाच लाख रुपये ठोस रक्कम मिळावी.ग्राम पोलीस अधिनियम 1967 मध्ये दुरुस्ती करण्यास प्राधान्या देण्यात यावे.नुतनीकरण पहिल्या पाच वर्षा नंतर कायमचे बंद करावे. गृह व महसूल विभागातील पदभरती करताना पोलीस पाटलांना प्रत्येकी पाच टक्के आरक्षणाचा लाभ पोलीस पाटलांना मिळावा महाराष्ट्र शासनाच्या वतीने पोलीसपाटलांचा पाच लाख रुपायाचा विमा उतरविण्यात यावा. शासनाकडून पोलिस पाटील आणि कुटुंबाला मेडिक्लेम देण्यात यावा अनुकंपा खाली नोकरीत सामावून घेण्यात यावे आदी सह विविध मागण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलिस पाटील संघाचे राज्य अध्यक्ष मा.बाळासाहेब शिंदे-पाटील व राज्य सचिव मा.कमलाकर मांगले याच्या नेतृत्वाखाली 22 डिसेंबर रोजी नागपूर च्या हिवाळी अधिवेशनावर मोठ्या संख्येने पोलिस पाटलांचा मोर्चा धडकणार आहे. तरी रायगड जिल्ह्यातील पोलिस पाटलांनी मोर्चा मध्ये सहभागी होण्याचे आव्हान पोलिस पाटील संघाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रकांत चेरफळे यांनी केले आहे.