ब्रेकिंग. दोन ट्रकच्या धडकेची दुर्घटना; वाहनाने घेतला पेट महामार्गावरील वाहतूक रोखली.

रत्नागिरी : मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावर हातखंबा दर्ग्याजवळ साखरेची पोती भरलेल्या दोन ट्रकने पेट घेतल्याने परिसरात घबराट पसरली आहे. सांगोल्याहून जयगडच्या दिशेने जाणाऱ्या दोन ट्रकची एका मागून एक धडक झाल्याने ट्रक पलटी होऊन दोन्ही ट्रकने पेट घेतला आहे. हातखंबा येथील वाहतूक पूर्णपणे थांबवली आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. चालक सुखरूप बाहेर पडले आहेत. तत्काळ जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानाची रुग्णवाहिका देखील घटनास्थळी पोहोचली आहे. रत्नागिरी येथील नगरपालिकेचे अग्निशमक दलाची गाडी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्याचे काम करत आहे.

Exit mobile version