रत्नागिरी नगर वाचनालयात अभ्यासकांसाठी नववर्षाच्या प्रारंभी सुरु होणार अभ्यासिका.. अभ्यासिकेचा लाभ घ्यावा : वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आवाहन.

रत्नागिरी– रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय हे रत्नागिरीतीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वात जुने वाचनालय म्हणून ओळखले जाते. वाचनालयाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या अनेकविध उपक्रमांमुळे ते जनमानसात सुपरिचित आहे.  जानेवारी 2023 पासून वाचनालय अजून एक नवीन उपक्रम सुरु करीत आहे.
            आजच्या काळात स्पर्धा परीक्षेला अन्यन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. अनेकांच्या मनात सरकारी नोकरी मिळणे, आयएएस, आयपीएस अधकारी बनण्याचे स्वप्न असते. त्यासाठी आवश्यक असणारे परिश्रम घ्यायची तयारी असते.  ही जिद्द घेऊन ते नेटाने अभ्यास करतात. केवळ परीक्षेच्या दिवसातच नव्हे, तर इतर वेळी देखील अभ्यासासाठी वाचनालयाच्या मुक्त वाचन विभागात विद्यार्थी वाचक सातत्याने येतात या अनुभवातून प्रेरणा घेऊन अभ्यासिका उपक्रम सुरू करत आहोत.
सुयोग्य, शांत, मध्यवर्ती जागा..
वाचनालयातील वातावरण व वाचनालयाची मध्यवर्ती जागा अभ्यासासाठी नक्कीच योग्य आहे.  मात्र वाचनालयाचा मुक्त वाचन विभागाला वेळेची मर्यादा असल्याने दुपारी वाचनालयाबरोबर वाचन विभागही बंद केला जात होता. त्यामुळे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वयंअध्ययनात खंड पडत होता.

▶️ जाहिरात..
▶️ चितळे नर्सिंग होम.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया व सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.


सलग अभ्यासाची सोय..
या सर्वांचा विचार करता सोमवार दिनांक 2 जाने. 2023 पासून रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालयाने आपला वाचनविभाग अन्य ठिकाणी हलवून वाचन विभागासाठी असलेलेल्या जागेचा वापर अभ्यासिकेसाठी करण्याचा निर्णय घेतला आहे. सलग एकमार्गी अभ्यास करता यावा म्हणून ही अभ्यासिका सोमवार दि. 2 जाने. 2023 पासून नाममात्र शुल्क आकारून सकाळी 9 ते सायं. 7 या वेळेत विद्यार्थांसाठी उपलब्ध असेल.  वाचनालयात नव्याने सुरु होणाऱ्या अभ्यासिकेत विद्यार्थ्यांसाठी अत्यावश्यक सोयीसुविधा उपलब्ध असतील.
वाचनालयातील संदर्भ पुस्तक ही उपलब्ध करणार
अभ्यासिकेतील विद्यार्थांना संदर्भासाठी लागणारी व वाचनालयात उपलब्ध असलेली पुस्तके उपलब्ध करुन दिली जातील. तसेच विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार वाचनालयामार्फत सवलतीच्या दरात पुस्तके मागवून दिली जातील. 
जागेच्या मर्यादेमुळे प्रथम नोंदणी करणाऱ्यास प्राधान्य दिले जाईल. या अभ्यासिकेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी रत्नागिरी (जिल्हा) नगर वाचनालय, जयस्तंभ रत्नागिरी येथे संपर्क साधून आपला प्रवेश निश्चित करुन अभ्यासिकेचा लाभ घ्यावा असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ जाहिरात…
▶️ नवीन वर्षाच्या रत्नागिरी शहर वासीयांना खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)
दखल न्यूज महाराष्ट्र..
▶️ जाहिरात…
▶️ नवीन वर्षाच्या रत्नागिरी वासीयांना खूप खूप शुभेच्छा..
▶️ शुभेच्छुक : श्री. निलेश आखाडे.
भाजपा भ वि जिल्हाध्यक्ष रत्नागिरी.शहर चिटणीस प्रभाग क्र.७
दखल न्यूज महाराष्ट्र..
Exit mobile version