साखरीनाटे येथील सोसायटीचे पदाधिकारी, संचालक व ग्रामस्थांनी घेतली सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य व उद्योजक किरण सामंत यांची भेट

जेट्टी व मच्छिमार ओट्याच्या उभारणीसंदर्भात केली चर्चा

राजापूर : तालुक्यातील साखरीनाटे येथील मच्छिमार सहकारी सोसायटी व ग्रामस्थ यांनी बाळासाहेब शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते व पत्रकार श्री सिद्धेश मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी रत्नागिरी येथे सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यकारी समितीचे सदस्य व उद्योजक श्री किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांची भेट घेतली. साखरीनाटे गावातील मच्छिमार जेट्टी व घेरा यशवंत गड येथील किना-यालगत मच्छिमार ओटा, मेरीटाईम बोर्ड अंतर्गत जेट्टी उभारणीच्या पार्श्वभूमीवर तसेच गावातील विविध समस्यांच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी या शिष्टमंडळाने मा.किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांची भेट घेतली. यावेळी साखरीनाटे सोसायटीचे चेअरमन शफी वाडकर, आदिल म्हसकर, शरफुद्दीन वाडकर, मुजाहिद हुना, गालीब हुना, सिकंदर हातवडकर, तबरेज पेज्ये, मुनीर म्हसकर, इनायत बोरकर आदी उपस्थित होते.

Exit mobile version