दर्पणकार आणि दर्पण दिन

पुरोगामी महाराष्ट्राने आजवर अनेक उद्योग व्यवसायांची मुहूर्तमेढ रोवली आणि ते व्यवसाय उद्योग नंतर विस्तारत गेले. नवं आणि समाजाला नेमकेपणाने काय हवे याची जाण ठेवून ज्यांनी कार्य केले ते अतिशय मोलाचे कार्य ठरलेले आहे. यात मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक म्हणून ज्यांना आपण ओळखतो ते दर्पणकार आणि अतिशय ज्ञानी असणाऱे बाळशास्त्री जांभेकर होत.
जांभेकरांनी मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले तो दिवस म्हणजे त्यांच्या वृत्तपत्राच्या नावे साजरा होणारा दर्पण दिवस होय. दर्पण पासून सुरु झालेली वाटचाल अव्याहतपणे सुरु आहे. 6 जानेवारी 1832 रोजी म्हणजे आजपासून 191 वर्षापूर्वी ब्रिटीश राजवटीच्या काळात हे वृत्तपत्र काढले.
राष्ट्रभक्ती आणि सामाजिक सुधारणा या दोन्ही भूमिका नजरेसमोर ठेवून त्यांनी ही सुरुवात केली. ती एक मोठ्या व्यवसायात आज आपल्या जीवनाचा घटक बनली आहे. बाळशास्त्री यांचा जन्म 20 डिसेंबर 1810 रोजी देवगड तालुक्यातील पोंभुर्ले या गावी झाला. सध्या हे गाव सिंधुदूर्ग जिल्ह्यात असले तरी त्याकाळी तो रत्नागिरी जिल्ह्याचा भाग होता. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी त्यांनी हे वृत्तपत्र इंग्रजी आणि मराठीत प्रकाशित केले ते जुलै 1840 पर्यंत चालू राहिले.

जाहिरात..


बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रेरणेतून या माध्यमयुगाची सुरुवात झाली. नंतरच्या काळात ‍ जितके स्वातंत्र्यासाठी लढणारे लढवय्ये होते त्यांनाही जांभेकरांनी प्रेरणा देवून वर्तमानपत्रांचा प्रभावी वापर केलेला आपणास दिसेल. त्याकाळी साधनांची उपलब्धता मर्यादीत होती ती तंत्रज्ञानाने दूर केल्यावर यात झपाटयाने विस्तार झाला आणि तो आज स्वतंत्र व्यवसायाच्या रुपात आपण बघत आहोत.
जांभेकरांनी त्याकाळी विज्ञान आणि गणित विषयक दिग्दर्शन हे मासिक 5 वर्षे चालविले भारतात शुन्याचा शोध लागला आणि त्या आकडयाचे गणितात किती महत्व आहे याबाबत ही त्यांनी लिखाण केले. त्यांच्या मासिकात इतिहास भूगोल यासोबतच रसायनशास्त्र, भौतिक शास्त्र आदिंबाबत विविध विषयांचे लेखन या मासिकात होते.
बाळशास्त्री जांभेकर हे मुंबईतील एल्फीस्टन कॉलेजमधील हिंदी विषयाचे पहिले प्राध्यापक होते. तसेच ते भाषा अभ्यासक देखील होते. त्यांनी काही काळ कुलाबा वेधशाळेतही संचालक म्हणून सेवा दिली.
अष्टपैलू व्यक्तीमत्वाचे बाळशास्त्री जांभेकरांनी आपल्याला रोज माहिती अपडेट करणाऱ्या वृत्तपत्र व्यवसायाची मुहूर्तमेढ करुन दिली. त्याचा प्रवास नंतर टिव्ही, वृत्तवाहिनी ते आजच्या सोशल मिडियापर्यंत आला आहे. आज दर्पणदिना निमित्त ही अल्पओळख.. प्रशांत दैठणकर

जाहिरात…
Exit mobile version