आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयात सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी.

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील, प्रा. अनंत पाध्ये यांच्यासह इतर शिक्षक व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी विद्यार्थ्यांना सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेणारा व्हिडिओ दाखविण्यात आला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना सावित्रीबाईंच्या व्यक्तित्वातील निश्चयाचा खंबीरपणा, अन्याया विरुद्ध प्रतिकार करण्याची वृत्ती, सामाजिक सेवाभाव इत्यादी गुण याबाबतची विविध उदाहरणे देऊन उपस्थितानी हे गुण आत्मसात करण्याबाबत आग्रही मत व्यक्त केले. उपप्राचार्य डॉ. सरदार पाटील यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सानिका भालेकर यांनी केले, तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी सीमा शेट्ये यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्विततेसाठी प्रा. प्रवीण जोशी, प्रा. अभिनय पातेरे, प्रा. मयुरेश राणे यांनी मेहनत घेतली. फोटो- सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर, उपप्राचार्य डॉ. पाटील, प्रा. शेट्ये.

जाहिरात..
Exit mobile version