खेड : तालुक्यातील शिक्षक बांधवांनी स्थापन केलेल्या मैत्री फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने खेड तालुक्यातील पत्रकारांचा ६ जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सन्मान करण्यात आला.सदर कार्यक्रम भरणे नाका येथील हॉटेल बिसू या ठिकाणी संपन्न झाला.मराठी पत्रकारितेतील दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने ६ जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो.खेड तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी यांचा सन्मान मैत्री फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. यावेळी खेड तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर साळवी,दैनिक सकाळचे गोविंद राठोड,दै. पुढारीचे पत्रकार अनुज जोशी, दैनिक लोकमतचे हर्षल शिरोडकर,दैनिक प्रहार चे देवेंद्र जाधव,आपलं कोकण चॅनलचे नंदेश खेडेकर,पत्रकार मंदार आपटे,लोकमतचे सुरेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पत्रकार संघाच्या वतीने मैत्री फाउंडेशनच्या कार्याचा गौरव करण्यात आला.यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष किशोर साळवी, दैनिक सकाळचे गोविंद राठोड, दैनिक पुढारीचे अनुज जोशी यांनी मैत्री फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी मैत्री फाऊंडेशनचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर,संजय सुर्वे,अमर चव्हाण,तुकाराम कातळे,किशोर देसाई,अनिल साळुंखे,नितीन साळुंखे,राजेंद्र बेलोसे,प्रशांत दळवी,संतोष चव्हाण,लक्ष्मण चोरगे,परेश खोपडे,महेश मर्चंडे,कपिल चव्हाण,विकास राठोड,अमोल जाधव,बाबासाहेब डोंगरे, सत्यप्रेम घुगे,चंद्रकांत चौधरी, राहुल जाधव,गणेश विरकर, आदी सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. परेश खोपडे यांनी तर आभार प्रदर्शन श्री.प्रशांत दळवी यांनी मानले.
