किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्था निवळी येथे युवासेनाच्या वतीने दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप.

रत्नागिरी : दि. 7 जानेवारी रोजी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री, रत्नागिरी व रायगड जिल्ह्य़ाचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत साहेब यांचे जेष्ठ बंधु यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक ठिकाणी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं.  आधारस्तंभ, मार्गदर्शक व सिंधुरत्न योजनेचे सदस्य तसेच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे सदस्य, प्रसिद्ध उद्योजक मा. श्री. किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त माहेर संस्था निवळी येथे युवासेना शहर समन्वय प्रथमेश साळवी, उद्योजक प्रज्ञेश रेडीज, उद्योजक प्रसाद कशेळकर यांच्या वतीने धान्य, कपडे व  दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटत करण्यात आले.
समाजसेवेचे महान कार्य हाती घेतलेल्या सामंत कुटूंबातील व्यक्तीचा वाढदिवस समाज सेवेच्या माध्यमातून साजरा व्हावा अशी आमची इच्छा होती. म्हणून हा कार्यक्रम केला असे प्रथमेश साळवी यांनी सांगितले.
माहेर संस्थेच्या वतीने श्री.कांबळे सर यांनी सर्वांचे आभार मानले व भैय्याशेठना वाढदिवसानिमित्त व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
*दखल न्यूज महाराष्ट्र.*

जाहिरात…
Exit mobile version