शिरगाव येथे उद्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उदघाटन.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) चिपळूण तालुकास्तरीय ५० वे विज्ञान प्रदर्शनाला आज सोमवार दि. ९ पासून सुरुवात झाली हे विज्ञान प्रदर्शन दि. ११ जानेवारी २०२३ पर्यंत शिरगांव येथील शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आले आहे.जिल्हा परिषद रत्नागिरी, पंचायत समिती, चिपळूण व रयत शिक्षण संस्थेचे शिरगांव माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित या विज्ञान प्रदर्शनात काल सोमवारी दि.९ रोजी सकाळी ११ ते ४ वेळेत विज्ञान साहित्य मांडणी व नोंदणी कार्यक्रम संपन्न झाला. आज मंगळवार दि.१० रोजी सकाळी ९ ते १०.३० विज्ञान दिंडी, १०.३० ते १२ उदघाटन समारंभ,१२ ते ५.०० प्रतिकृती परीक्षण व प्रश्नमंजुषा कार्यक्रम होणार असून उद्या बुधवार दि.११ रोजी १०.३० ते ११.३० विज्ञान नाटिका, १.३० ते ४.०० बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. अशी माहिती गट विकास अधिकारी श्रीमती उमा घारगे-पाटील, गटशिक्षणाधिकारी दादासाहेब इरनक व
मुख्याध्यापक मुकुंद रोकडे यांनी दिली.या विज्ञान प्रदर्शनाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रदर्शन पहावे असे आवाहन जिल्हा परिषद रत्नागिरी पंचायत समिती चिपळूण व रयत शिक्षण संस्थेचे शिरगाव माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने करण्यात आले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

Exit mobile version