➡️ मेष : आजचा दिवस चांगला असणार आहे.आर्थिक स्थिती चांगली असेल. कामात यश मिळेल. प्रेम जीवनासाठी चांगला दिवस. मेहनत अधिक करावी लागेल. प्रवास होऊ शकतो.
➡️ वृषभ : लोक काय म्हणतात याकडे लक्ष देऊ नका. मानसन्मान मिळेल. विचार करण्यात वेळ घालवू नका कार्यवाही करा. काहीशी निराशात जाणवेल. वाहन सावकाश चालवा.
➡️ मिथुन : आरोग्याची काळजी घ्या. परिवारातील वाद समजदारीने सोडवा. यश मिळण्यासाठी मेहनत ही केली पाहिजे. आत्मविश्वास वाढेल, प्रेम संबंधांमध्ये गंभीर होऊ नका, तुम्हाला कायम साथ देणारी व्यक्ती आज मिळू शकते. एखादी व्यक्ती आपली फसवणूक करू शकते.

➡️ कर्क : घरगुती समस्या जाणवू शकते मात्र त्यातून मार्ग मिळेल. तुमचं अनुभव इतरांना शेअर कराल. मालमत्ता किंवा वाहन खरेदी करायचा विचार असल्यास यश मिळेल. एखाद्या लहानशा गोष्टीने निराशा जाणवेल.
➡️ सिंह : शक्तिशाली दिवस आहे आज प्रचंड ऊर्जेने काम कराल. आज तुमच्यात भावुकता दिसेल. घर आणि व्यवसाय यामध्ये तुमचे योगदान असेल. जुन्या मित्राची आठवण येईल. कुटुंबातील प्रत्येकाला समजून घ्या. जीवनसाथीची उत्तम साथ मिळेल.
➡️ कन्या : तुमच्या वागण्याने कोणी दुखावणार नाही याची काळजी घ्या. सामाजिक कामात योगदान राहील. तयार केलेली योजना सफल होईल. कोणाशी बोलताना शांततेने बोला.
➡️ तुला : आवडत्या व्यक्तीचा सहवास लाभेल. कामात आधुनिकता आणा. वेळ वाया जाणार अशा व्यक्तीपासून दूर राहा. आज काहीसा तणाव जाणवेल मात्र कामाच्या बाबतीत अतिशय सुंदर दिवस. विदेशात जाण्याची इच्छा असल्यास तेथे काम मिळेल. गणपतीची पूजा करा.
➡️वृश्चिक : अध्यात्मिक कार्यात सहभागी व्हाल. अडकलेले धन मिळेल. गाडी आणि संपत्ती घेण्याच्या प्रयत्नात अडथळे येतील. काळजी करू नका समस्या हळूहळू दूर होतील. मानसिक तणाव जाणवेल, विवादित विषयावर सावधानता बाळगा कोणत्याही कामाला थोडा वेळ द्या.
➡️धनु : पैसे खर्च करू नका. किमती वस्तू सांभाळून ठेवा. रोजगारामध्ये यश मिळेल शनीची साडेसाती असताना रोजगार बाबत चांगली बातमी मिळेल. मानसिक शांती ठेवा. मित्रांच्या सहकार्याने आर्थिक उन्नती होईल मानसन्मान वाढेल.
➡️ मकर : कोणत्यातरी नातेवाईकाच्या तब्येतीबाबत आपण चिंतेत राहाल. अतिरिक्त खर्च टाळा प्रेमाचा विषयात निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. वाणीत गोडवा ठेवा, सरकारी कामात सावध राहा.
➡️ कुंभ : कोणतेही काम हसत मुखात कराल. आज दुविधा परिस्थिती जाणवेल. जे तुम्हाला मनापासून मदत करतात त्यांना काही वेळ द्या. कुटुंबातील व्यक्ती रागात असेल तर तुम्ही शांत रहा आणि परिस्थिती हाताळा. वाद विवाद टाळा, कोणतीही काम आत्मविश्वासाने करावे. मानसन्मान वाढेल.
➡️ मीन : नोकरी क्षेत्रात मुलाखतीत यश मिळेल. प्रभावशालीव्यक्ती बरोबर वेळ जाईल. तुमच्या कामावर तुम्ही विश्वास ठेवा. भाऊबीजेचा दिवस आहे भावंडांन बरोबर वाद करू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे लक्ष हे दिलेच पाहिजे.
▶️ दखल न्यूज महाराष्ट्.