रत्नागिरी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत देश हा आंतरराष्ट्रीय वीस देशांचे नेतृत्व करणार आहे. ही भारत देशासाठी फार मोठी अभिमानाची गोष्ट आहे हे लक्षात घेता भारतात सर्वत्र या गोष्टीचे कौतुक होताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण करीत आहे.

रत्नागिरी नाचणे येथे आज अंजली साळवी रत्नागिरी प्रदेश सदस्य आयोजित कार्यक्रमाला जी-20 कार्यक्रम प्रभाग क्र.7 विश्वनगर माघी गणेशोत्सव या ठिकाणी घेण्यात आला. सर्व महिला पारंपारिक देशांमध्ये उपस्थित होत्या रांगोळी काढून भारताचे देशाचे कौतुक करण्यात आले. उपस्थितांना मकर संक्रांतीचे औचित्य साधून तिळगुळ देत तोंड गोड केले. भारत माता की जय वंदे मातरम अशा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला उपस्थित महिला जिल्हाध्यक्ष ऐश्वर्या जठार, शिल्पा मराठे तालुकाध्यक्ष तनया शिवलकर तालुका उपाध्यक्ष स्नेहा जोशी, सौ प्राजक्ता रूमडे, सायली बेर्डे, शोभा जीरोळे, राजीव कीर, भ वि जिल्हाध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख निलेश आखाडे, कृष्णकांत उर्फ भाई जठार श्री नागवेकर, तसेच प्रभाग 7मधील शरयू जाधव, निधी आखाडे, प्रतिभा जाधव, संजीवनी खुळे सायली जाधव, रवीना मकवाना , प्रीती मकवाना, रिया मोहिते, सीमा सावंत , सलोनी माटल, संजना कुरतडकर , पूजा राठोड ,अमृता कोत्रे, नीलिमा पांचाळ, सविता माने, विनया कांबळे, सुवर्णा पवार, माधवी कांबळे, अवंतिका पवार,सोनाली शेडगे महिला उत्स्फूर्तपणे उपस्थित होत्या. दखल न्यूज महाराष्ट्र.