वडगाव बुद्रुक येथील बंधा-याबाबत २६ जानेवारी २०२३ रोजी आमरण उपोषण…….

खेड : ” जलयुक्त शिवार अभियान” सन २०१८- २०१९ अंतर्गत गाव वडगाव बुद्रुक ता. खेड, जि. रत्नागिरी येथे जगबुडी (कुंभा) नदीवर सिमेंट कॉंक्रिटचा बंधारा बांधण्यात आला, सदर बंधा-यावरती २१,९५००० ( एकवीस लाख पंच्यान्नव हजार ) रुपये खर्च करण्यात आले.

या बंधा-यामुळे मे महीन्याच्या शेवटपर्यंत गावच्या नळपाणी योजनेच्या विहीरीमध्ये पाणी राहावे या उद्देशाने गावक-यांनी या बंधा-याची मागणी केली होती, परंतु या बंधा-याच्या बांधकामामध्ये ठेकेदाराने भ्रष्टाचार केल्याचा गावक-यांच्या लक्षात येताच ग्रामस्थ व मनसेचे घाटकोपर शाखा क्रं.१३० चे उपाध्यक्ष श्री. सचीन अनाजी मोरे यांनी मिळून प्रशासनाकडे धाव घेतली. दि. ८ डीसेंबर २०२२ रोजी बंधा-याची प्राथमीक चौकशी करण्यात आली, या चौकशी अहवालाची प्रत मिळावी याकरीता श्री. सचीन अनाजी मोरे यांनी जिल्हाधीकारी यांच्याकडे दि.२४ डीसेंबर २०२२ रोजी अर्ज केला होता परंतु त्यांना चौकशी अहवालाची प्रत मिळाली नसल्यामुळे हे प्रशासन त्यांच्या व्यथा जाणुन घेत नसल्याचे व भ्रष्टाचार करणा-या ठेकेदाराला पाठीशी घालत असल्पाचे गाववाले व मोरे यांच्या निदर्शनास आले. वरील सर्व घडामोडी लक्षात घेऊन ठेकेदार व रु.२२ लाखाचे काम रु. ५ लाखात करून ते रु.२२ लाखाचे झालेले आहे असे मंजुरी पत्रावर सही करणा-या अधीका-यावर ग्रामस्थांचा मानसीक छळ व भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी २६ जानेवारी २०२३ रोजी तहसीलदार कार्यालयाच्या आवारात वडगाव ग्रामस्थांसह श्री. सचीन मोरे हे आमरण उपोशणाला बसणार आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version