स्व. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे संकुलाचा, चिपळूण शाखेचा २८ व २९ जानेवारीला वर्धापन दिन – आ. ऋतुजा लटके यांची उपस्थिती.

चिपळूण : (ओंकार रेळेकर ) लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे संकुलाचा, चिपळूण शाखेचा २८ व २९ला वर्धापन दिन सोहोळा आ. ऋतुजा लटके यांची उपस्थिती. महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट मुंबई शाखा चिपळूणच्या स्व. लक्ष्मीबाई बाळासाहेब माटे संकुलाचा आठवा दिन सोहोळा व चिपळूण शाखेचा वर्धापन दिन सोहोळा शनिवार दि. 28 व रविवार दि. 29 जानेवारी रोजी ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बाबूराव दाते, मुंबईतील आमदार श्रीमती ऋतुजाताई लटके यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शनिवारी सकाळी 1 वाजता रक्तदार शिबिराचे उद्घाटन यशस्वी उद्योजक एस. एम. तटकरे यांच्या हस्ते होईल. सकाळी दहा वाजता आरोग्य शिबिराचे उद्घाटन चिपळूण अर्बन बँकेचे ज्येष्ठ संचालक मोहनशेठ मिरगल यांच्या हस्ते होईल. रविवार दि. 29 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता श्रींच्या मूर्तीवर अभिषेक, सकाळी साडेआठ वाजता श्री सत्यनारायणाची महापूजा, साडेनऊ वाजता श्री सत्यनारायणाची महाआरती, दुपारी दहा वाजता नवनिर्वाचित सरपंच, सदस्य, विविध क्षेत्रात निवडून आलेले संचालक यांचा सत्कार होईल. दुपारी बारा वाजता डीबीजे महाविद्यालयातील मराठीचे प्राध्यापक व संत साहित्याचे अभ्यासक प्रा. विनायक बांद्रे यांची श्रीकृष्ण या विषयावर व्याख्यान होईल. दुपारी महाप्रसाद, महिलांसाठी हळदीकुंकू, सायंकाळी 6 वाजता हरिपाठ व भजन होईल.
या कार्यक्रमाला उद्योजक मनोहर वाजे, शंकरशेठ माटे, चंद्रकांत भोजने, जयंद्रथ खताते, निशिकांत भोजने, राजेश केळसकर, रघुनाथ मिरगल, किसनशेठ माटे, अनिलशेठ चिले, एकनाथ ठसाळे, निलेश भुरण, दिशा दाभोळकर, डॉ. संतोष दाभोळकर, हरिश्चंद्र करंजकर, राजेश वाजे, हरिशेठ कासार, प्रमोद ठसाळे यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कार्याध्यक्ष नितीन ठसाळे, उपकार्याध्यक्ष विलास वाजे, शाखा चिटणीस मनोज भोजने, सहचिटणीस सुदेश महाडिक, खजनिदार सुभाष भोजने, मुंबई कार्याध्यक्ष विजय खेडेकर यांनी केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात….
Exit mobile version