रत्नागिरी : प्रवाशांचा प्रवास आरामदायी व्हावा यासाठी महामंडळाने नव्याने बस घेण्याचा निर्णय घेतला होता. जुन्या गाड्यांचे प्रदूषण होत असल्यामुळे नव्याने बीएस ६ प्रणालीच्या बस आणण्यात आल्या आहेत. रत्नागिरी विभागात बीएस ६ च्या नव्या कोऱ्या २१ आरायमदायी लाल बस दाखल झाल्या आहेत. एकूण ५० गाड्या रत्नागिरी विभागासाठी देण्यात आल्या आहेत. त्यापैकी २१ गाड्या दाखल झाल्या असून उर्वरित गाड्या लवकरच येणार असल्याचे एसटी विभागाकडून सांगण्यात आले.
जुन्या झालेल्या गाड्या सतत काम देत होत्या त्याचप्रमाणे वाहकास देखील या गाड्या चालवताना प्रचंड त्रास होत होता. अशा जुन्या गाड्या बाबत सतत तक्रारी येत होत्या. त्यामुळे एसटी महामंडळाने नवीन गाड्या घेण्याचा निर्णय घेतला होता. नव्याने दाखल झालेल्या गाड्यांमुळे एसटी विभागाकडे पुन्हा प्रवासी आकर्षित होण्याची आशा व्यक्त होत आहे. या बसमध्ये दर्जेदार सुविधा असणार आहेत. ४४ आसनांची आणि दोन बाय दोन आसन रचना, स्वयंचलित दरवाजा, पुढच्या मागच्या बाजूला डिजिटल मार्गदर्शक फलक, मोबाईल चार्जिंग, मागे आपत्कालीन दरवाजा अशा सुविधा असणार आहेत. रत्नागिरी विभागाला देण्यात आलेल्या या सर्व बस कंत्राटी पद्धतीने चालणार आहेत. बसचा देखभाल खर्च खासगी कंत्राटदार करणार आहे. त्या बदल्यात एस. टी विभागाकडून काही रक्कम देण्याचा करार करण्यात आला आहे. एसटी महामंडळाने घेतलेला हा निर्णय प्रवाशांसाठी लाभदायक ठरणार आहे. त्यामुळे प्रवास प्रवासी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

काशी यात्रा (उत्तर भारत सहल)
▶️ उत्तर भारत सहलीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आग्रा ,मथुरा, वृंदावन, गोकुळ, वाराणसी, अयोध्या, ऋषिकेश, हरिद्वार, जम्मू, कुरुक्षेत्र, अमृतसर, दिल्ली आणि बरेच काही.
▶️ आपल्या मित्रमंडळी नातेवाईकांसह आजच बुकिंग करा.
अधिक माहितीसाठी : –
संपर्क : 8767900418
: 8830406964