मुख्यमंत्री शिंदेंचा मेट्रो प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा, माहिती अधिकारातून पुरावे आले समोर : ‘आप’ महाराष्ट्र.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मेट्रो’ प्रकल्पग्रस्तांच्या घरवाटपात एक हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप आज आम आदमी पक्षाच्या मुंबई अध्यक्षा प्रीती शर्मा-मेनन यांनी आज केला असल्याचे वृत्त सामनाने प्रसिद्ध केले आहे. प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेल्या दोन हजार घरांमध्ये हा घोटाळा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यामध्ये खोटे लाभार्थी, खोटे सर्वेक्षण, एकाच व्यक्तीला चार ते पाच घरे असे गंभीर प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत माहिती अधिकारात मिळालेले पुरावेच त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
          मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये ‘एमएमआरडीए’कडून आतापर्यंत सुमारे 65 हजार ‘पीएपी'(प्रोजेक्ट एफेक्टेड पर्सन) घरांचे वाटप करण्यात आले आहे. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्याकडे 2014 पासून नगरविकास खाते असल्यापासून प्रचंड मोठ्या प्रमाणात घोटाळा सुरू असल्याचा आरोप मेमन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन केला आहे. दोन हजार घरांच्या वाटपात एक हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात…
जाहिरात
Exit mobile version