रायगड : रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सोलमकोंड एकतर्फी प्रेमातून धक्कादायक घटना घडली आहे. एकतर्फी प्रेम प्रकरणातुन 23 वर्षीय तरुणाने आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेमुळे सोलमकोंड गावात खळबळ माजली आहे.
एकतर्फी प्रेम प्रकरणातुन 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची घटना महाड तालुक्यातील सोलम कोंड येथे घडली आहे. सतीश पवार असे मृत तरुणाचे नाव आहे. त्याचे एका मुलीवर एकतर्फी प्रेम होते. तीने नकार दिल्याने सतीश दारूच्या आहारी गेला आणि नैराश्यातुन घरात नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत त्याने आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने जीवन संपवल्याचा स्टेटस ठेवला असल्याचे त्याच्या मित्र मंडळींकडुन सांगण्यात येत आहे. या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.तरुण मुलं असा टोकाचं पाऊल का उचलतात असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणी महाड MIDC पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
