मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त रेपोली येथे विद्यार्थीना फळ वाटप..

प्रतिनिधी : राम भोस्तेकर

माणगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याच्या वाढदिवसाचे आवचित्य साधून बाळासाहेबांची शिवसेना रेपोली व रेपोली ग्रामस्थांच्या वतीने रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेपोली येथे फळ वाटप करण्यात आले.मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पदाधिकारी याच्या कडून राज्यभरात वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच अनुषंगाने रेपोली ग्रामस्थांनी  गावातील जिल्हा परिषद शाळेत विध्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.
          त्यावेळी कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना शाखा प्रमुख रघुनाथ बेंदुगडे, माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य गोपाळ नाडकर,शरद मोरे पोलीस पाटील,  मुख्याध्यापक तोरमाल ,सुभाष शिगवण, सिध्देश शिगवण,दत्तात्रय कडू,  जायभाय मॅडम, कल्पेश पिसाट  शिक्षण कमिटी अध्यक्ष तसेच  गावातील ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थ्यांनी  शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी  व विद्यार्थी यांनी मुख्यमंत्री यांना शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version