शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करीता प्रेम अरूण बेगची निवड.

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयातर्गत पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा क्रीडा परिषद विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत शालेय विभाग स्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुल संभाजी नगर कोल्हापूर येथे दिनांक १० ते ११ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेत १४,१७,आणि १९ वर्षाखालील मुला/ मुलींची वजनगटामध्ये कराटे फाईट प्रकारात घेण्यात आल्या. सदर स्पर्धेमध्ये ३०० कराटे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला.
            या स्पर्धेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून १७ वर्षाखालील वयोगटात कु. प्रेम अरूण बेग (सेक्रेड हार्ट कॉन्व्हेन्ट स्कूल शहर रत्नागिरी) यांची ८२ किलो वरील वजनगटात रत्नागिरी जिल्हा स्तरावर त्यांची निवड करण्यात आली होती दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजी शालेय विभागीय कराटे स्पर्धेमध्ये त्याने प्रथम क्रमांक पटकावला आणि अपल्या जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले. तसेच त्याची दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जिल्हा क्रीडा संकुल, बारामती येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय कराटे स्पर्धे करीता निवड करण्यात आली आहे. कु. प्रेम अरूण बेग हा रत्नागिरी तालुक्यातील पहिला कराटे खेळाडू आपल्या रत्नागिरी जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करणार आहे. त्याच्या फुडील यशासाठी सर्व पालकवर्ग व शाळेतील शिषक वर्ग यांनी त्याला भरभरून शुभेच्छा दिल्या.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version