घेरापालगड येथे श्रीमंतयोगी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा.

१९ फेब्रुवारी ला सकाळी ९ वाजता किल्लेमाची युवा आणि ग्रामस्थ मंडळ यांनी गडावर शिवजयंती सोहळा आयोजित केला आहे.सर्व शिव भक्तांनी शिवजयंती साठी उपस्थित राहण्याचे आव्हान केले आहे .तसेच तीर्थ प्रसादाचा लाभ घ्यावा किल्ले घेरापालगड एका दुर्गम गडाचा अनोखा इतिहास समुद्रसपाटी पासून १३५० फुट उंचीवर असलेल्या किल्ले घेरापालगडचे क्षेत्रफळ १ एकरपेक्षा कमी असुन किल्ला त्रिकोणी आकाराचा आहे.गडाला एकुण ९ बुरुज असुन दोन दरवाजाशेजारी दोन,तटबंदीच्या मध्यभागी एक,गडाच्या निमूळत्या होत गेलेल्या तीन सोंडेच्या टोकाला प्रत्येकी एक बुरुज अशी याची रचना आहे.इतक्या लहान गडाला दोन दरवाजे असण्याचे प्रयोजन मात्र लक्षात येत नाही. गडाच्या दुसऱ्या दरवाजातून येणारी वाट अवघड असुन वापरात नाही.या वाटेवर पाण्याचे एक खोदीव टाके आहे.गडावर दोन तोफा पाहायला मिळतात.तसेच किल्ल्यावरती खोदकाम चालू असताना २२ तोफगोळे सापडले आहेत
किल्ल्यावर उध्वस्त झालेल्या वाड्यांचे जोते तसेच एक सुकलेलं पाण्याचं टाके दिसुन येते.गडाची तटबंदी आजही मोठया प्रमाणात शिल्लक आहे. किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची मात्र अजिबात सोय नाही.तसेच निदान पाण्याची खोदीव कोरडी टाकीही कुठे दिसत नाहीत.पण गडावरून दिसणारं दृश्य मात्र अप्रतिम आहे.पूर्वेकडे लांबवर दिसणारी महिपत,सुमार व रसाळगड,हि दुर्गत्रयी,खाली पूर्वेकडे दिसणारे छोटेसे पण अतिशय सुंदर घेरा पालगड गाव दक्षिणेकडे खेड शहर आणि पश्चिमेकडे पालगड गाव.या गडाच्या इतिहासात डोकावताना छत्रपती शिवाजी महाराजानी हा किल्ला बांधला.छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाह,मोगल, सिद्धी व परकीय व्यापारी यांच्या आक्रमणापासून वाचवण्यासाठी रायगड किल्ल्यास भोवताली अनेक किल्ल्यांची साखळी निर्माण केली.या स्वरक्षणात्मक कवचातील सुवर्णदुर्ग, बाणकोट व पालगड हे गड महत्वाचे आहेत कि ज्यांनी रायगड किल्यास सहाय्यक,पूरक म्हणून काम केले. शिवकाळात या गडांचा उपयोग हा लष्करी दृष्टीने खूप महत्वाचा होता.
अधिक माहितीसाठी संपर्क:
विवेक कदम-९३२६२८७१२६
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version