रत्नागिरी :- रत्नागिरी नगर परिषद नाचणे रोड प्रभाग क्रमांक सात नूतन नगर येथील रत्नागिरी नगर परिषदेचे उद्यान यामध्ये मोठ्या प्रमाणात झाडे आणि गवत वाढले आहे त्यामुळे या ठिकाणी खेळण्यासाठी येणाऱ्या लहान मुलांना त्याचा नाहक त्रास होत असून साप, विंचू यांचा वावर यामध्ये दिसून येत आहे. कोणाच्यातरी जीवाला यामुळे धोका निर्माण होऊ शकतो.

या ठिकाणी सकाळी फिरायला येणारे लोक यांना येथे वाढलेल्या गवताचा त्रास होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर येतील गवत साफ करून मिळावे ही विनंती आहे. तसेच या उद्यानात असलेली लहान मुलांची खेळणी, घसरगुंडी, झोपाळे हे मोडकळीस आलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे लहान मुलांना या ठिकाणी खेळता येत नाही व मोडकळीस आलेली खेळणी मुलांना खेळण्यास धोकादायक झाली आहेत त्यामुळे रत्नागिरी नगर परिषदेने या उद्यानाच्या सुशोभीकरणाकडे देखील लक्ष देऊन येथील उद्यान सुशोभित करावे अशी विनंती आम्ही करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पंकज पुसाळकर यांनी रत्नागिरी नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्याकडे ही विनंती केली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र..