माणगांव पोलीस ठाणे येथे करण्यात आला सन्मान खाकीचा.

प्रतिनिधी : राम भोस्तेकर माणगांव

माणगांव ; पोलीस ठाणे येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दि. १० मार्च रोजी सन्मान खाकीचा कार्यक्रम पार पडला. यामध्ये माणगांव पोलीस ठाणे अंतर्गत काम करणाऱ्या महिला पोलिसांचा पत्रकार वेल्फेअर असोसिएशन व पोलीस प्रवाह तर्फे सत्कार करण्यात आला.
यामध्ये पोलीस उपनिरीक्षक अस्मिता पाटील, पो. ना. निवेदिता धनावडे, पो. शि. दिपाली मोरे, अश्विनी मदने, पो. ह. प्रीती ओमले, वैशाली कोंजे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी पो. नि. राजेंद्र पाटील, स. पो. नि. सतीश आस्वर, मोहिते, आघाव, पो. शि. शाम शिंदे, रामनाथ डोईफोडे, कोळेकर, पोलीस प्रवाह संस्थापक नवनाथ कापले, पत्रकार परेश शिंदे, सत्येंद्र सिंह, सुहास राक्षे, प्रमोद जाधव, निरंजन कळस, सुनील राजभर, राम भोस्तकेर, नचिकेत म्हापसेकर, वैभव सत्वे व पोलीस कर्मचारी आदी उपस्थित होते. फोटो- पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या समवेत सन्मानार्थी महिला पोलीस, संस्थापक नवनाथ कापले आदी मान्यवर दिसत आहेत.(छाया-राम भोस्तेकर, माणगांव)

जाहिरात..
Exit mobile version