चंद्रकांत विष्णू गोरेगावकर यांची “संत रोहिदास विकास मंडळ गोरेगाव” च्या अध्यक्ष पदी सर्वानुमते निवड..

प्रतिनिधी : राम भोस्तेकर

माणगाव : निर्भीड पत्रकार, गोरेगाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा.विभागीय अध्यक्ष,शांत, संयमी,हुशार असे चंद्रकांत विष्णू गोरेगावकर यांची संत रोहिदास विकास मंडळ गोरेगाव,ता.माणगाव, जि.रायगड च्या अध्यक्षपदी सर्वानुमते निवड झाली.
त्यावेळी उपाध्यक्षपदी निर्भीड पत्रकार प्रसाद रमेश गोरेगावकर, सचिव पदी राकेश भगवान गोरेगावकर, खजिनदार प्रसाद जाधव, सह खजिनदार किशोर कृष्णा कापडेकर अशी कार्यकारिणीची ग्रामस्थांकडून सर्वांनुमते निवड झाली.
…चंद्रकांत विष्णू गोरेगावकर यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की मंडळाने जी जबाबदारी दिली आहे ति पेलण्यास समर्थ आहे आणि येणाऱ्या दिवसात मंडळासाठी नवनवीन उपक्रम राबविण्यात येतील व मंडळासाठी भरघोस योगदान देणार असल्याचे सांगितले.
नवनिर्वाचित कार्यकरणी निवडीने मंडळामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून कार्यकारणी वर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version