मौजे कोल्हेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दगड क्रेशरला ग्रामस्थांचा विरोध, सरपंचाने दिलेली परवानगी रद्द करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी..

मौजे कोल्हेवाडी ग्रामपंचायत हद्दीतील दगड उत्खनन (क्रशर) करण्यासाठी श्री.रवी इन्फाबिल्ड प्रोजेक्ट प्रा.लि. उदयपूर राजस्थान तर्फे श्री. सुनिल विष्णू प्रसाद श्री. वास्तव यांना दगड उत्खनन खडी क्रशर परवानगीसाठी दि. १८/०७/२०२२ रोजी हे पत्र ग्रामपंचायतकडे प्राप्त झाले होते. हा विषय सरपंचांनी दि.२१/०७/२०२२ रोजीच्या ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये उपस्थित केला असता सदरहू परवानगी ग्रामपंचायत सदस्यांनी न देता ग्रामसभेची परवानगी घेऊन हा विषय ग्रामसभेच्या अजिंडयावर घेवून त्यासाठी विशेष ग्रामसभा घेवून या अर्जाचा फैसला करावा असे ठरविण्यात आले. त्यानंतर हा विषय दि. २२/०८/२०२२ रोजीच्या ग्रामसभेमध्ये आयत्या वेळच्या विषयामध्ये सरपंचांनी हा विषय घेतला असता ग्रामसभेने बहुमताने या प्रस्तावास विरोध केला आणि दगड क्रशरला परवानगी देऊ नये असा ठराव क्र.०६/०२ करुन परवानगी नाकारण्यात आली. असा ठराव होऊनही सरपंच सौ. वैदेही विजय बेंद्रे, उपसरपंच सौ. वैष्णवी नरेश सावंत, ग्रामसेवक चेतन दाभोळकर आणि दोन ग्रामपंचायत सदस्य अभिजित नरेश सावंत आणि सौ. साक्षी शरद सावंत यांनी कोणालाही विश्वासात न घेता तसेच कोणतीही विशेष ग्रामसभा न लावता स्वतःच्या मनमानीने व स्वार्थीपणे या क्रशरला नाहरकत दाखला दिला गेला.
सदर क्रशर प्लॅटमुळे आमच्या ग्रामचे ग्रामदैवत श्री. केदारलिंग या मंदिरास धोका संभवतो.

जाहिरात..

त्याचप्रमाणे सदर उत्खनन ज्या जागेत होणार आहे. त्या ठिकाणी पर्यावरणाच्या दृष्टीने दुर्मीळ असलेला खवले मांजर याचा अधिवास आहे. आणि गावच्या भूरचनेच्या दृष्टीने विचार करता जर उत्खनन केले, तर भूगर्भातील पाण्याचे प्रवाह हे विरुद्ध दिशेला जाऊन गावात पाण्याचे दुर्भिक्ष होऊ शकते. तसेच गावातील लगतच्या शेतकऱ्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये जाण्याचे मार्ग बंद होऊ शकतात. या बाबी सरपंचांच्या निदर्शनास दि.ड २७/०३/२०२३ रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेमध्ये दिल्या गेल्या. तेव्हा सरपंचांनी दिलेली परवानगी रद्द करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मा. जिल्हाधिकारी यांना निवेदन देताना कोल्हेवाडी ग्रामपंचायत माजी सरपंच व आताचे सदस्य राजेंद्र घडशी, संजय सावंत सदस्य, संदेश सावंत, हेगिष्टे. व रवींद्र सावंत, गणेश सावंत, सुभाष सावंत,बाळकृष्ण पाष्टे गावकर, रवींद्र आग्रे ,सुनील पांचाळ आण्णा पांचाळ,प्रसाद पांचाळ, अन्य गावकरी मंडळी. उपस्थित होते.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version