चिपळूणजवळ कोकण रेल्वेची धडक बसल्याने युवकाचा मृत्यू.

चिपळूण – तालुक्यातील पेढे कुंभारवाडी येथील उमेश दिलीप मालवणकर या युवकाला रेल्वेची धडक बसल्याने जागीच मृत्यू झाला. कोकण रेल्वे मार्गावर चिपळूण नजीक असलेल्या पेढे कुंभारवाडी येथे काल सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास रेल्वे ट्रॅक ओलांडत शेतात जात असताना उमेश याला मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने येत असलेल्या एका रेल्वेची धडक बसली त्यात चिरडून उमेश याचा जागीच मृत्यू झाला.
          या दुर्घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून उमेश याचा मृतदेह शवविच्छेदनााठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. उमेश याच्या पश्चात आई, वडील व एक बहीण असा परिवार आहे तर 30 वर्षीय उमेश मालवणकर यांच्या मृत्यूने पेढे कुंभारवाडीवर शोककळा पसरली आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version