महाराष्ट्रातील तसेच कोकणातील शासकीय कर्मचार्यांचे गाव घडविण्यासाठी शैक्षणिक चळवळ सुरू करणारे ‘तिमिरातून तेजाकडे’ या संस्थेचे अध्यक्ष व भारत सरकारच्या मुंबई येथील सीमाशुल्क विभागात कनिष्ठ अनुवाद अधिकारी या पदावर कार्यरत असलेले सात शैक्षणिक अहर्ता प्राप्त कोकणचे सुपुत्र मा. श्री. सत्यवान रेडकर यांचे निशुल्क स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान शुक्रवार दिनांक ७ एप्रिल,२०२३ रोजी सकाळी ९:०० वाजता देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या स्वर्गीय द. ज. कुलकर्णी सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले आहे. या व्याख्यानासाठी देवरुख परिसर व संगमेश्वर तालुक्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यानी अधिकाधिक प्रमाणात सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी केले आहे. सहभागिनी अधिक महितीसाठी महाविद्यालयाचे स्पर्धा परीक्षा समन्वयक ग्रंथपाल प्रा. श्री. सुभाष मायंगडे (मोब. ९८६०५७२७९७) यांच्याशी संपर्क साधून आपल्या प्रवेश निश्चित करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र..
