रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची घेतली पत्रकार परिषद; राहुल गांधी यांची खाजदारकी रद्द करण्यात आली हा लोकशाहीचा अपमान..

रत्नागिरी : देशभर लोकशाहीची अवहेलना होत आहे.संसदेत प्रश्न विचारत होते अदानीला भाजप सरकार का वाचवत आहे.वाढती महागाई, बेरोजगारी, रोजगार, यासारखे प्रश्न उपस्थित करून भाजप सरकारला बेजार करून टाकून असे प्रश्न मा. राहुल गांधी उपस्थित करत होते म्हणून खोटी केस चालवून त्यात दोन वर्षाची शिक्षा देण्यात आली व त्यांची खाजदार की रद्द करण्यात आली. ही तर लोकशाहीचा अपमान आहे. त्यामुळे जिल्हा काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन निषेध व्यक्त केला. सदर निषेध फक्त राहुल गांधी यांची खाजदारकी रद्द झाली म्हणून नाही देशातील १४० करोड जनतेसाठी लोकशाहीची मूल्य वाचवण्यासाठी आहे.असे ठामपणे सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव यांनी पत्रकार परिषद मध्ये सांगितले. तदप्रसंगी ओबीसी विभाग प्रदेश उपाध्यक्ष दीपक राऊत, सोशल मीडिया विभाग राज्य समन्वयक विनय खामकर, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष कपिल नागवेकर, महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे,दिलीप मोहिते,कैसर देसाई,वासुदेव सुतार,काका तोडणकर,कल्पेश जाधव, तुळसाराम पवार,विश्वनाथ किल्लेदार,दीपक दळवी इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..
Exit mobile version