निर्जला दीपक शिंदे हीचा अनोख्या पद्धतीने साजरा झाला वाढदिवस

स्वतः साठवलेल्या पैशातून वृध्द आजी आजोबांना दिल्या भेटवस्तू

चिपळूण (ओंकार रेळेकर)वृध्दाश्रम मधील आजी आजोबा यांच्यासोबत आनंद साजरा करीत त्यांना भेटवस्तू देत चिपळूण मधील पत्रकार सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांच्या ज्येष्ठ कन्या निर्जला हीचा वाढदिवस मंगळवारी साजरा करण्यात आला.
चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथील लीलावती आधार आश्रम येथील वृद्धाश्रमात सर्व आजी-आजोबांसोबत निर्जला हिने केक कापून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करीत बालवयातच समाजात एक वेगळाच आदर्श निर्माण करून दिला आहे. या वेगळ्या उपक्रमासाठी तिचे वडील सामाजिक कार्यकर्ते दीपक शिंदे यांनी तिला विशेष प्रोत्साहन दिले. या वेळी नात आणि आजोबा आजी यांनी एकमेकांना केक भरवला सौ. दिव्या दीपक शिंदे,दीपक शिंदे,लीलावती आधार आश्रमचे व्यवस्थापक राम देसाई,श्री.चव्हाण ,लीलावती आधार आश्रमाचे सर्व आजी आजोबा या वेळी उपस्थित होते.निर्जलाने हिने साठवलेल्या पिग्मी बँक मधून आजी आजोबांना भेटवस्तू दिल्या आजी आजोबांनी हा सोहळा पाहून आनंदाश्रू अनावर झाले.

फोटो : निर्जला हीचा लीलावती आधार आश्रम येथे वाढदिवस साजरा करतांना व्यवस्थापक राम देसाई,दीपक
शिंदे,सौ. दिव्या शिंदे,आणि आजी आजोबा छायाचित्रात दिसत आहेत(छाया : ओंकार रेळेकर)

जाहीरात
Exit mobile version