राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील पांगरे बु. शेंबवणे ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरपंच मा. वैष्णवी संतोष कुळये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महाराष्ट्रचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आरोग्यसेवक पांगरे बौद्धवाडीतील ग्रामस्थ श्री महेंद्र पडावे यांनी केले. तंटामुक्ती अध्यक्ष सौं. अमिता पवार यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी गीत गायले. ग्रामसेवक श्री श्रीराम पांचाळ यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल ची माहित उपस्थित ग्रामस्थाना दिली.
वरील कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य सौं. अवतिका पवार, विश्वनाथ सावंत, संतोष कुळये तंटामुक्ती अध्यक्ष सौं अमिता पवार, ग्रामसेवक श्रीराम पांचाळ, शिपाई संदीप पिलके, डाटा ऑपरेटर निकिता पांचाळ, जेष्ठ ग्रामस्थ शांताराम सावंत, आरोग्यसेवक महेंद्र पडावे, सौं. सोनाली कुडाळी, अंगणवाडी सेविका सौं. सोनाली सावंत पांगरे बौद्धवाडीतील ग्रामस्थ, शेंबवणे बौद्धवाडीतील ग्रामस्थ, कातळवाडीतील महिला यावेळी कार्यक्रमाला उपस्थित होत्या अशा प्रकारे विविध मार्गदर्शनपर कार्यक्रमांनी भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली..
