ऑलिम्पियाड गणित परीक्षेतजागुष्टे हायस्कूलच्या शिवानी पटवर्धन हिला सुवर्णपदक

रत्नागिरी- शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये सिल्व्हर झोन राष्ट्रीय ऑलिम्पियाड गणित स्पर्धा परीक्षेला दि. न्यू एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमती रा.गो.जागुष्टे हायस्कूलमधून प्रथमच इयत्ता दहावीतील १४ व आठवीतील ९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. या शाळेतील दहावी अ मधील शिवानी धनंजय पटवर्धन हिने गणितमध्ये शाळेमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. महाराष्ट्र राज्यात 194 वा क्रमांक, भारत पश्चिम विभाग( दादरा नगर हवेली,दीव दमण, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गोवा) 412 वा क्रमांकावर आणि संपूर्ण भारतामध्ये 3092 व्या क्रमांकाने यशस्वी झाली आहे. शिवानी पटवर्धन हिने या परीक्षेत सुवर्णपदकही प्राप्त केले आहे.

या परीक्षेला बसलेल्या 23 विद्यार्थ्याना गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील माजी गणित विभागप्रमुख व सेवानिवृत्त प्राध्यापक डाॅ. राजीव सप्रे यांनी या परीक्षेसाठी ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीने मार्गदर्शन केले होते. या परीक्षेची काठिण्य पातळी बघता 50% गुण मिळविणे अवघड असते. शिवानी पटवर्धन हिने 58.30% गुण मिळवून हे यश संपादन केले आहे. डाॅ. सप्रे मे 2022 पासून कोणतेही मानधनाची अपेक्षा न ठेवता दररोज सकाळी 9.30 ते 10.30 या वेळेत आठवी व दहावी या दोन वर्गाना गणिताचे अध्यापन करत होते.

शिवानी पटवर्धन व मार्गदर्शक शिक्षक यांचे संस्थेच्या कार्याध्यक्षा ॲड सुमिता भावे, संस्था सचिव दिलीप भाताडे, संस्था पदाधिकारी, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कात्रे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

फोटो ओळी- शिवानी पटवर्धन व मार्गदर्शक शिक्षक डाॅ. राजीव सप्रे यांचा फोटो

जाहिरात…
Exit mobile version