लाच घेताना खेडशी मंडळ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले..

रत्नागिरी – तालुक्यातील खेडशी मंडळ अधिकाऱ्याला ३१ हजार रुपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरीच्या पथकाने रंगेहाथ पकडले .
        लाचलूचपत प्रतिबंधक विभाग  रत्नागिरीने दिलेल्या माहितीनुसार, घटनेतील  तक्रारदार ( पुरुष –  वय ४९ वर्षें ) यांचे पक्षकार यांचे नावावर असलेला सातबारा दुरुस्ती करण्याकरिता दहा हजार रुपये तसेच त्यांचे इतर पक्षकार यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे सातबारा उताऱ्यावर घेण्यात आलेल्या फेरफार नोंदीची मंजुरी देण्याकरिता २१ हजार रुपये असे एकूण ३१  हजार रुपये लाच रकमेची अमित जगन्नाथ चिपरीकर, वय ३९ , मंडळ अधिकारी, खेडशी, ता. जि. रत्नागिरी   याने  मागणी करून मागणी केलेली लाच रक्कम ३१  हजार रुपये स्वीकारली असता रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
         ही कारवाई सुशांत चव्हाण, पोलीस उपअधीक्षक, लाचलूचपत प्रतिबंधक विभाग रत्नागिरी, पोहवा विशाल नलावडे, पोना दीपक आंबेकर, पो. शि. हेमंत पवार, म.पो. शि. वैशाली धनावडे यांच्या पथकाने केली. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहीरात..
Exit mobile version