नवी मुंबई – (प्रमोद तरळ) महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे व नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे तरुण, तडफदार युवा अध्यक्ष मा. श्री अभिजित धुरत यांची झेडआरयुसीसी (ZRUCC CR रेल मंत्रालय भारत सरकार) सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल गुरुवार दि. ११ मे २०२३ रोजी कल्याण स्टेशन मॅनेजर अनुपकुमार जैन तथा सीसीआय कल्याण मनोजकुमार यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार करण्यात आला
मध्य रेल्वे झोनच्या वापरकर्ते सल्लागार समितीचे पुनर्गठन करण्यात आले यावेळी गेली अनेक वर्षे प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ व नवी मुंबई रेल्वे प्रवासी वेल्फेअर असोसिएशनचे युवा अध्यक्ष मा. धुरत यांची मध्य रेल्वे झोनच्या वापरकर्ते सल्लागार समितीच्या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली मा. धुरत यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत असून प्रवाशांच्या समस्या मांडणारा सच्चा कार्यकर्ता नियुक्ती झाल्याची भावना प्रवाशांत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
