आठल्ये-सप्रे- पित्रे महाविद्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन..

देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन केले. प्रा. धनंजय दळवी यांनी आपल्या प्रास्ताविकात संभाजी महाराजांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेतला. प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी संभाजी महाराजांचे शौर्य, धैर्य आणि पराक्रम याबाबतची उदाहरणे घेऊन संभाजी महाराजांना अनेक भाषांमधील असणारी जाण विशद केली. महाराजांचे संस्कृत भाषेबाबत असणारे विशेष प्रभुत्व आणि त्यांनी लिहिलेले साहित्य याची सखोल माहिती दिली. ग्रंथपाल प्रा. सुभाष मायंगडे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्धी व ग्रंथालय विभागाच्यावतीने करण्यात आले होते. ग्रंथालय विभागाच्यावतीने ग्रंथपाल प्रा. मायंगडे यांनी विद्यार्थ्यांसाठी छत्रपती संभाजी महाराजांविषयीची महत्वपूर्ण माहिती, प्रा. नितीन बानुगडे-पाटील यांचे 'स्वराज्यरक्षक संभाजी महाराज यांचा खरा इतिहास' या विषयावरील व्याख्यान, डॉ. दिनेश काचकुरे यांचे 'संभाजी महाराज जीवन परिचय' याबाबतच्या माहितीच्या युट्युब लिंक्स उपलब्ध करून दिल्या. छत्रपती संभाजी महाराजांचे कार्यकर्तृत्व विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावे यासाठी विविध वर्गांच्या ग्रुपवर लिंक्स पाठवण्यात आल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक सौरभ जाधव यांनी मेहनत घेतली.

फोटो- छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना प्राचार्य डॉ. तेंडोलकर व ग्रंथपाल प्रा. मायंगडे.
छाया- प्रा. धनंजय दळवी.

जाहिरात..
Exit mobile version