माहितीचा अधिकार कार्यकर्ता महासंघाच्यावतीने चिपळूण तालुका कार्यकारिणीची निवड

चिपळूण तालुकाध्यक्षपदी – सौ.स्वाती हडकर ,उपाध्यक्षपदी श्री.योगेश पेढांबकर ,कार्याध्यक्षपदी श्री.बाळू कोकाटे यांची सर्वानुमते निवड

चिपळूण : (ओंकार रेळेकर) माहिती अधिकार महासंघ
,महा.राज्य वतीने आज चिपळूण तालुकाकार्यकारिणी निवड साठी चिपळूण येथे झुंजार कार्यकर्त्यांची सभा आयोजित करण्यात आली होती.या सभेसाठी रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकार कार्यकर्ता महा.राज्य ,जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित होते. यावेळी सभेला सर्वानुमते चिपळूण तालुकाध्यक्षपदी – सौ.स्वाती हडकर ,उपाध्यक्षपदी श्री.योगेश पेढांबकर ,कार्याध्यक्षपदी श्री.बाळू कोकाटे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
व उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी अनुमोदन दिले.
माहितीचा अधिकार कायदा एक क्रांतिकारी कायदा आहे. शासकीय विभागात पारदर्शकता वाढविणे हा उद्देश असून माहितीचा अधिकार कायद्याची अंमलबजावणी १५ जून २००५ रोजी संसदेच्या कायद्यानुसार करण्यात आली. हा कायदा १२ ऑक्टोबर २००५ पासून लागू करण्यात आला. शासनाच्या विभागातील त्यांच्या नियंत्रणात असलेली माहिती मिळविणे हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. आपल्या गावाच्या विकासाकरिता ग्रामपंचायत, शहराचा विकास करण्याकरिता नगर पंचायत, नगरपरिषद, नगरपालिका तसेच शासनाचे अनेक विभाग असून आपल्या विकासासाठी जनतेचा निधी खर्ची टाकून विकास करण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु गावातील, शहरातील नागरिकांना कोणतीही माहिती दिली जात नाही. त्यासाठी नागरिकांना आपल्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी माहितीचा अधिकार वापरणे आवश्यक आहे.
भ्रष्टाचार दूर करण्याचा प्रयत्न करणे, विकास कामांचा दर्जा सुधारावा याकडे विशेष लक्ष देणे, गावातील विकास कामांचा निधी व केलेल्या कामांची माहिती मिळविणे या उद्देशने युवकांना मार्गदर्शन नवनिर्वाचित चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर* यांनी संबोधित केले सभेवेळी चिपळूण तालुकाध्यक्ष सौ.स्वाती हडकर* यांनी सर्वांनी एकजुटीने व एकसंघ राहून आपले प्रामाणिक कार्य करायचे आहे.असे सर्व कार्यकर्त्याना मार्गदर्शन केले आहे. सभेला उपस्थित माहिती अधिकार कार्यकर्ता महा.संघ रत्नागिरी जिल्हाउपाध्यक्ष श्री.राजू बोथरे,चिपळूण तालुका महिलाध्यक्षा सौ.स्वाती हडकर, चिपळूण तालुका उपाध्यक्षपदी श्री.योगेश पेढांबकर, तालुका कार्याध्यक्षपदी बाळू कोकाटे , चिपळूण तालुका सहसचिव महिला तालुका शहरध्यक्षा सौ. विद्या भेकरे, चिपळूण तालुका महिला मुख्य प्रचारप्रमुख सौ.मानसी मुदलियार, महिला तालुका निमंत्रक सौ. दिपाली पाटील,चिपळूण शहराध्यक्ष श्री. सुरेश फके , श्री.गुरव,तसेच इतर उपस्थित झुंझार कार्यकर्ते आदी उपस्थित होते.सभेचे सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन संघटनेचे चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर यांनी केले. सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली.

फोटो : माहिती अधिकार महासंघ,महाराष्ट्र राज्य,वतीने आज चिपळूण तालुका कार्यकारिणी निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित जिल्हाउपाध्यक्ष श्री.राजू बोथरे ,नवनिर्वाचित महिला अध्यक्षा सौ.स्वाती हडकर,चिपळूण तालुका उपाध्यक्ष श्री.योगेश पेढांबकर,कार्याध्यक्षपदी श्री.बाळू कोकाटे, चिपळूण तालुका सहसचिव श्री.दीपक शिंदे,इतर उपस्थित धडाडी महिला ,इतर मान्यवर छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर)

जाहिरात…
Exit mobile version