राजापूर – (प्रमोद तरळ)
ग्रीन प्लॅनेट बायो प्रोडक्ट ही कंपनी गेली २१ वर्षे जमीन वाचवा, जीवसृष्टी वाचवा या अभियानाच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भारतीय शेती समॄध्द व सुपीक करण्यासाठी कार्यरत आहे या कंपनीच्या वतीने सोमवार दि. ५ जून २०२३ रोजी स. १०.०० वा. श्री साई विमलेश्वर मंगल कार्यालय, नूतन विद्यामंदिर समोर,ओणी येथे भव्य शेतकरी जागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे
सदर अभियानात जमिनीची नैसर्गिक ताकद व पिकांचे भरघोस असे उत्पादन कशा पद्धतीने वाढविता येईल याबद्दल मा. नवनीत मॅडम (Agronomist), मा. विजय सुतार सर (Silver Star Corel),मा.कृष्णात चव्हाण सर (Three Star Sapphire), मा. नामदेव खोत सर (One Star Executive) आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत
सदर अभियानात आंबा, काजू, सुपारी,भात, भाजीपाला,बांबू आणि इतर सर्व पिके यावरती जागतिक स्तरावरील तज्ञ शास्त्रज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राजापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन संयोजक मा. दयानंद चौगुले, मा. संतोष आंबरे, मा. महेश पितळे,मा. संतोष निकम यांनी केले आहे..
